ई पिक पाहणी 2023 ची सुरुवात तारीख 1 जुलै | e pik pahani 2023 start date 1july

e pik pahani
ई पिक पाहणी 2023 ची सुरुवात तारीख 1 जुलै | e pik pahani 2023 start date 1july

ई पिक पाहणी(e pik pahani)

महाराष्ट्र राज्य सरकार ने ॲपच्या साह्याने पीकाची नोंदणी करतायावे म्हणून ई पिक पाहणी e pik pahani प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्र मध्ये राबविण्यात येत आहे.

खरीप हंगाम २०२३ पीक पहाणी नोंदणीसाठी ई पिक पाहणीचे २.०.११ हे अपडेट व्हर्जन गूगल प्ले स्टोर वर उपलब्ध करून दिले आहे.

तरी सर्व शेतकारींनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे.

खरीप हंगाम २०२३ प्रत्यक्ष पीक पहाणी मोबाइल ॲपद्वारा पीक पाहणी करण्यासाठी १ जुलै २०२३ पासून सुरू करण्यात येत आहे.           

        

ई पिक पाहणी म्हणजे काय?


ई-पीक सर्वेक्षण मोबाईल ॲपच्या मदतीने शेतकऱ्यांच्या पीकाची नोंदणी ठेवायचे चे काम केले जाते. 

शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेचा थेट लाभ इ-पिक पाहणी प्रकल्पातील माहितीद्वारे देता येतो. 

पीक पाहणी मुळे खातेदारांना पीक कर्ज देणे, पिक विमा भरणे तसेच पीक नुकसान भरपाई शक्य होणार आहे.


E Peek Pahani app मध्ये आपण काय काय करू शकतो?


महसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी "e pik pahani" या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

या मोबाईल अप द्वारे शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदी, बांधावरच्या झाडांच्या नोंदी, व चालू पड / कायम पड क्षेत्राच्या नोंदी अक्षांस व रेखांशासह नोंदविण्याची सोय देण्यात आलेली आहे.


app डाउनलोड करण्याकरिता येथे क्लिक करा

  

ई पिक पाहणी customer care number काय आहे?

ई पिक पाहणी customer care number - 020-25712712 'e pik pahani'

 e pik pahani


Post a Comment

0 Comments