कापूस बियाणांची माहिती मराठीत | cotton seeds information marathi

cotton seeds
कापूस बियाणांची माहिती मराठीत | cotton seeds

कापूस बियाणे(cotton seeds)

मागील काही वर्षांपासून कापूस लागवडीचे क्षेत्र फार वाढत आहे. त्या तुलनेने पिक उत्पादकता नाही आहे.

त्यातील एक कारण म्हणजे बहुतांश शेतकरी जमिनीचा पोत लक्षात घेऊन पिकांची निवड करीत नाहीत.

शेत जमिनीचा प्रकार आणि आपल्या भागातील वातावरण अनुसार आपल्या भागामध्ये कोणते बियाणे हे फायदेशीर व उपयुत ठरू शकते हे आज आपण पाहू.   


अग्रगण्य कापूस बियाणे खालील प्रमाणे आहेत  

कोरडवाहु क्षेत्र करिता कापसाचे वाण -

01) MAHYCO DHANDEV + MRC 7373 BG-II COTTON

  • कालावधी 100-130 दिवस.
  • अधिक शाखा पसरणारी आणि मजबूत वनस्पती.
  • मोठा बॉल आकार – वजनाने जास्त.
  • चांगली रोगप्रतिकारशक्ती.
  • प्रति एकरी 08 ते 10 क्विंटल उतार.

02) MH Aditya Moksha BG-II

  • लागवडीचा महिना मे च्या शेवटी ते जून पर्यंत.
  • लागवड पद्धत 04/1.5.
  • मोठे बोंड आणि वेचणीस सोपे.
  • प्रत्येक एकर 08 ते 09 क्विंटल उतार.
  • जास्त फांद्या आणि मजबूत वनस्पती.
  • कालावधी 100-120 दिवस.

03) Cotton Rasi MAGIC (RCH 386 BG II)

  • लागवडीचा महिना हा जून.
  • मुबलक पाण्यातही तग धरते.
  • ताट आणि मोठे बोंडे.
  • कापूस वेसणीस सोपा असतो .
  • एकरी 9 ते 10 क्विंटल उतार.
  • लागवड पद्धत 04/1.5.
  • कालावधी 90 -120 दिवस.

04) AJEET 155 BG-II COTTON SEEDS

  • पावसावर आधारित तसेच सिंचनासाठी योग्य.
  • पाण्याच्या ताणाच्या परिस्थितीला अत्यंत सहनशील लागवड.
  • शोषक कीटकांना अत्यंत सहनशील.
  • पाने लाल होणे अत्यंत सहनशील.
  • लागवडीचा महिना हा जून.
  • मुबलक पाण्यातही तग धरते.
  • ताट व मोठे बोंडे.
  • एकरी 9 ते 10 क्विंटल उतार.
  • लागवड पद्धत 04/1.5.
  • कालावधी 90 -120 दिवस.

05) MAHYCO JUNGEE COTTON

  • लागवडीचा महिना में ते जून.
  • लागवड पद्धत 04/1.5.
  • कालावधी 110 ते 140 दिवस.
  • कोरडवाहू क्षेत्रासाठी अत्यंत चांगले.
  • कीटकांसाठी अत्यंत सहनशील.
  • मोठे बोंडे आणि वेचनिस सोपा.
  • एकरी 08 ते 10 क्विंटल.

बागायती क्षेत्र करिता कापसाचे वाण -

01) RASHI SEEDS RCH 659

  • दाट आणि पाच पाकळ्या असणारी बोंड.
  • सिंचनासाठी अत्यंत सोईस्कर.
  • बोंडात सरकीचे प्रमाण जास्त.
  • लागवड पद्धत 04/1.5.
  • लागवडीचा महिना में ते जून.
  • शोषण किड्यांवर प्रभावी वाण.
  • एकरी 10 ते 15 क्विंटल उतार.

02) BIOSEEDS GHH 029 BG II

  • लागवडीचा महिना जून
  • लागवड पद्धत 04/1.5.
  • मोठे आणि दाट तसेच पाच पाकळ्या असलेले बोंडे
  • शोषण किडयावर प्रभावी वाण
  • प्रत्येक एकरी 15 ते 20 क्विंटर उतार
  • १० ते १२ ग्रॅम वजनाची बोंडे
  • जास्त फांद्या आणि मजबूत वनस्पती

03) Prabhat Seeds Supercot PCH – 115 BG – II

  • लागवडीचा महिना जून.
  • लागवड पद्धत 04/1.5.
  • प्रत्येक एकरी 15 ते 20 क्विंटर उतार.
  • 10 ते 15 ग्रॅम वजनाची बोंडे.
  • शोषण किडयावर प्रभावी वाण.
  • बोंडात सरकीचे प्रमाण जास्त.
  • लागवड पद्धत 04/1.5.

04) Cotton Srikar JaiHo 60 SS 66 BG II

  • दाट आणि पाच पाकळ्या असणारी बोंड.
  • सिंचनासाठी अत्यंत सोईस्कर.
  • बोंडात सरकीचे प्रमाण जास्त.
  • लागवड पद्धत 04/1.5.
  • लागवडीचा महिना में ते जून.
  • शोषण किड्यांवर प्रभावी वाण.
  • एकरी 12 ते 15 क्विंटल उतार

05) Mahyco Cotton Seeds – Bahubali MRC 7918 BG2

  • पावसावर आधारित तसेच सिंचनासाठी योग्य.
  • पाण्याच्या ताणाच्या परिस्थितीला अत्यंत सहनशील लागवड.
  • शोषक कीटकांना अत्यंत सहनशील.
  • पाने लाल होणे अत्यंत सहनशील.
  • लागवडीचा महिना जून.
  • ताट आणि मोठे बोंडे.
  • एकरी 15 ते 18 क्विंटल उतार.
  • लागवड पद्धत 04/1.5.
  • कालावधी 150 -160 दिवस.

 

कापूस बियाणांच्या दर किती आहेत?

कापूस बियाणांच्या 'cotton seeds' दरात यावर्षी वाढ करण्यात आली आहे.

मागील वर्षी ४७५ ग्रॅमच्या पॅकेटसाठी ८१० रुपये द्यावे लागत होते. मात्र दरवाढ केल्याने आता एका पॅकेटसाठी ८५३ रुपये मोजावे लागत आहेत.

या दरवाढमुळे शेतकऱ्यांना कापसाच्या बियाणांवर निश्चितच जास्त खर्च करावा लागणार आहे.

कापूस बियाणांचे cotton seeds अधिचे दर १८०० रुपये प्रति किलो होते तर आताच्या दरवाढीनुसार १८९५.९५ रुपये प्रति किलो दर असणार आहेत.

 

4g कापूस बियाणे काय आहे?

  • त्यात फायबरची लांबी जास्त असते
  • हे गुलाबी बोंडअळीला प्रतिरोधक आहे
  • हे इतर जातींपेक्षा उजळ पांढरे आहे

या कापसाच्या जाती 4Bt, Bt4, आणि 4G अशा विविध नावांनी ओळखल्या जातात.

बीटी कापसातील “बीटी” म्हणजे “बॅसिलस थुरिंगिएन्सिस”. ”हा एक जीवाणू आहे ज्यामध्ये विषारी जनुक आहे जे कीटकांना लक्ष्य करते "cotton seeds" 

शास्त्रज्ञांनी हे बीटी विषाचे जनुक जीवाणूमधून काढले आहे आणि कापसात घातले आहे. गुलाबी बोंडअळीसारख्या मोठ्या किडींना प्रतिरोधक कपाशी देऊन जनुक व्यक्त होते.

 cotton seeds

Post a Comment

0 Comments