जाणून घ्या सोयाबीन स्प्रे शेड्यूल बद्दल सर्व 2023-2024 माहिती मराठी | know all about soybean spray schedule 2023-2024 info marathi

soybean spray schedule
जाणून घ्या सोयाबीन स्प्रे शेड्यूल बद्दल सर्व 2023-2024 माहिती मराठी | know all about soybean spray schedule 2023-2024 info marathi

सोयाबीन फवारणी वेळापत्रक(soybean spray schedule)


शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीन फवारणीच वेळापत्रक "soybean spray schedule" कसे असावे व काय काळजी घ्यावी कसे असेल संपूर्ण नियोजन हे पाहणार आहोत  

सोयाबीन हे महाराष्ट्र मध्ये घेतल्या जाणार पीक मधल प्रमुख पीक आहे.

याचे कारण म्हणजे त्यातील मिळणार नफा व भरपूर उत्पन्न हे आहे

या लेखामध्ये आपण प्रामुख्याने काय काळजी घ्यावी फवारणी वेळी व फवारणीच वेळापत्रक सविस्तरपणे पाहणार आहोत.

 

सोयाबीन फवारणी वेळापत्रक खालील प्रमाणे

 

अ) पहिली फवारणी

1. फवारणीची वेळ – सोयाबीनची पहिली फवारणी साधारण 15 ते 20 दिवसानंतर करावी.
2. फवारणी औषधे – प्रोक्लेम, सिंजेंटा 15 ग्रॅम + 19:19:19 खत 75 ग्रॅम + युपियल, साफ (कार्बेन्डाझिम 12%+ मन्कोझेब 63% wp) 15 ग्रॅम + टाटा बहार, टाटा रॅलीस – 30 मिली.
3. वरील सर्व औषधे एकत्र करून 15 लिटर पंपामध्ये मिक्स करून फवारणी करावी.

ब) दुसरी फवारणी

1. फवारणीची वेळ – सोयाबीन ची दुसरी फवारणी साधारण 35 ते 40 दिवसाच्या दरम्यान करावी.
2. फवारणी औषधे – 12:61:00 खत 75 ग्रॅम + बायर कॉन्फिडोर (इमिडाक्लोप्रिड 17.8% SL)- 0.5 मिली/लीटर पाणी + बायर एम्बिशन (अमीनो एसिड आणि फुल्विक एसिड) – 2 मिली/लीटर पाणी.
3. वरील सर्व औषधे एकत्र करून 15 लिटर पंपामध्ये मिक्स करून फवारणी करावी.


हे देखील वाचा – कापूस बियाणे व्हरायटी यादी


क) तिसरी फवारणी

1. फवारणीची वेळ – सोयाबीनची तिसरी फवारणी soybean spray schedule 55 ते 60 दिवसानंतर करावी.
2. फवारणी उद्देश – सोयाबीन मध्ये फुलांची संख्या आणि उत्पादन वाढवण्यासाठी ही फवारणी करावी लागते.
3. फवारणी औषधे – गोदरेज डबल (होमोब्रैसिनोलाइड 0.04%) – 1 मिली/लीटर पाणी + महाधन एनपीके 00:52:34 – 5 ग्रॅम/लीटर पाणी + महाधन कॉम्बी – चिलेटिड – 1 ग्रॅम/लीटर पाणी
4. वरील सर्व औषधे एकत्र करून 15 लिटर पंपामध्ये मिक्स करून फवारणी करावी.

ड) चौथी फवारणी

1. फवारणी उद्देश – सोयाबीन वरील चक्रीभुंगा, ॲन्थ्रॅक्नोज बुरशी चे नियंत्रण तसेच पिकाची वाढ चांगली होण्यासाठी फवारणी करावी.
2. फवारणी औषधे – बायर, एंट्राकोल (प्रोपीनेब 70% डब्लू पी) – 2 ग्रॅम/लीटर पाणी + एफमसी, कोरेजेन (क्लोराँट्रानिलिप्रोल 18.5%) – 0.4 मिली/लीटर पाणी + महाधन 00:00:50 – 5 ग्रॅम/लीटर पाणी
3. वरील सर्व औषधे एकत्र करून 15 लिटर पंपामध्ये मिक्स करून फवारावी.


काय काळजी घ्यावी फवारणी वेळी?


1. फवारणी ही सकाळी 11 च्या पहिले किंवा संध्याकाळी 4 च्या नंतर करावी.
2. फवारणी साठी योग्य पीएच लेवल म्हणजेच 6.5 ते 7.5 ph चे पानी वापरावे.
3. फवारणी करताना जमिनीत ओलावा असेल याची काळजी घ्यावी.
4. वारे जर जास्त वेगाने वाहत असेल तर फवारणी करू नये. 'soybean spray schedule' 
5. फवारणी द्रावण तयार करताना एक घटक पाण्यात टाकून पानी 2-3 मिनिट चांगले ढवळावे व त्या नंतरच दूसरा घटक मिसळावा.

तुम्हाला मित्रांनो सोयाबीन फवारणी वेळापत्रक हा लेख तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा.

soybean spray schedule

Post a Comment

0 Comments