गांडूळ खत मराठी अपडेट | gandul khat marathi update

gandul khat
गांडूळ खत मराठी अपडेट | gandul khat marathi update


गांडूळ खत(gandul khat)


शेतकरी मित्रांनो आज आपण गांडूळ खत "gandul khat" निर्मिती ची संपूर्ण माहिती सविस्तर रूपात पाहणार आहोत.गांडूळ खतला vermicompost असे ही म्हणतात.   

आपण प्रामुख्याने गांडूळ खताचे आपल्याला काय फायदे आहेत , कोणते गांडूळ खत चांगले आहे , गांडूळ खत (vermicompost) बेड तयार कसे करावे , गांडूळ खत तयार होण्यास किती कालावधी लागतो , गांडूळ खताची 1kg ची किंमत किती आहे गांडूळ खतांमुळे होणारे फायदे याबद्दल सविस्तरपणे पाहणार आहोत.


गांडूळ खताचे आपल्याला काय फायदे आहेत?


 • गांडूळ खत हे भरपूर अन्नद्रव्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रिय खत असून जैविक गुणधर्म वाढविते.
 • गांडूळ खत हा सेंद्रीय शेतातील एक महत्वाचा घटक आहे.
 • गांडूळ खतामुळे जमीन भुसभुशीत राहते, त्यामुळे जमिनीत हवा व पाणी खेळते राहते.
 •  पिकांची वाढ अधिक वेगाने व जलद गतीने होते.
 •  पाण्याचा योग्य निचरा होतो व जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते.
 • पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढल्याने, पाऊस नियमित न झाल्यास, पिकाला  पाण्याचा ताण पडत नाही.
 • बागायती पिकांबाबत सिंचनाचा खर्च कमी होतो व पाण्याची बचत होते.
 • गांडूळ खत हे कचऱ्यापासून निर्माण होते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी गांडूळ खत निर्माण करण्यावर भर द्याला हवे.
 • उत्पादन खर्च कमी होतो आणि चांगला नफा मिळतो.

हे देखील वाचा ई पिक पाहणी 2023 ची सुरुवात तारीख 1 जुलै


कोणते गांडूळ खत चांगले आहे?


इसेनिया फेटिडा, युड्रिलस युजेनिया आणि पेरीओनिक्स एक्झाव्हॅटस या काही प्रजाती आहेत ज्यांचे संगोपन सेंद्रिय कचऱ्याचे खतामध्ये रूपांतर करण्यासाठी केले जाते.
गांडूळखतात gandul khat वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून ते वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढवतात.


हे देखील वाचा महिला सन्मान बचत पत्र 2023-2024 योजनेबद्दल सर्व जाणून घ्या, 2 लाखांपर्यंतची गुंतवणूक मराठी


गांडूळ खत (vermicompost) बेड तयार कसे करावे?

 

 •  बेड पद्धतीने गांडूळ खत तयार करण्यासाठी साधारणतः 2.5 ते 3 मीटर लांबीचे आणि 90 सेंटिमीटर रुंदीचे बेड तयार करावेत.
 •  प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्यावी.
 •  ढीगाच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस यासारख्या लवकर न कुजणाऱ्या पदार्थांचा तीन ते पाच सेंटीमीटर जाडीचा थर रचावा त्यावर पुरेसे पाणी शिंपडून ओला करावा.
 •  या थरावर तीन ते पाच सेंटीमीटर जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्टचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा.
 • या थराचा उपयोग गांडुळांना तात्पुरते निवासस्थान म्हणून होतो.
 • या थरावर पूर्ण वाढलेली गांडूळे अलवारपणे सोडावेत.
 • साधारणतः शंभर किलो ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळ खत तयार करण्यासाठी सात हजार प्रौढ गांडुळे सोडावी.
 • दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष जनावरांचे मलमूत्र धान्याचा कोंडा, शेतातील तण, गिरीपुष्प शेवरी या द्विदल हिरवळीच्या झाडांची पाने, मासोळी खत, कोंबड्यांची विष्ठा इत्यादींचा वापर करावा.
 • या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिकच चांगले असते.
 • त्यातील कर व नत्राचे गुणोत्तर 30 ते 40 च्या दरम्यान असावे. संपूर्ण ढिगाची उंची 60 पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घ्यावी.
 • कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थामध्ये चाळीस ते पन्नास टक्के पाणी असावे.
 • त्यासाठी ढिगावर गोणपाटाच्या आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी फवारावे.
 • ढिगातील सेंद्रिय पदार्थाचे तापमान 25 ते 30 सेल्सियस अंशांच्या दरम्यान राहील याची काळजी घ्यावी.


गांडूळ खत (gandul khat) तयार होण्यास किती कालावधी लागतो?


गांडुळाचा वापर करून गांडुळ खत तयार होण्यास साधारणतः 35 ते 50 दिवसाचा कालावधी लागतो. 'gandul khat'


गांडूळ खताची 1kg ची किंमत किती आहे?


साधारणता गांडूळ खताची एक किलोची बॅग आपल्याला 60-70 रुपयांपर्यंत मिळते.


तुम्हाला मित्रांनो गांडूळ खत निर्मिती हा लेख तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा.

gandul khat

Post a Comment

0 Comments