आपली चावडी पोर्टल 2023 मराठी अपडेट | Aapli Chawdi Portal 2023 marathi update

Aapli Chawdi


आपली चावडी
(Aapli Chawdi)

शेतकरी बांधावानो महाराष्ट्र राज्य सरकार सातत्याने नवे नवे उपक्रम आणात असते.

त्यातलाच एक भाग म्हणून आज आपण Aapli Chawdi बदल माहिती घेणार

आहोत.

      

आपली चावडी डिजिटल नोटिस बोर्ड म्हणजे काय आहे?


आपली चावडी डिजिटल नोटिस बोर्ड हे महाराष्ट्र राज्य सरकारच्या महसूल विभागाने तयार केलेले एक वेब पोर्टल आहे.

या द्वयरे महाराष्ट्र राज्यातील नागरिक त्यांच्या जमिनीशी संबंधित सर्व प्रकारच्या नोंदी ऑनलाईन पाहू शकतील.

या वेब पोर्टलचे फायदा असा की तलाठी कार्यालय मध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये गेल्याशिवाय आपल्याला जमिनीच्या खरेदी विक्रीची माहिती घर बसल्या मिळेल.

 

आपली चावडी चे अधिकृत संकेतस्थळ काय आहे?


आपली चावडीची अधिकृत वेबसाइट

https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi आहे.


या पोर्टलच्या साह्याने "Aapli Chawdi" आपण कोण कोणत्या सेवाचा लाभ घेऊ शकतो ते पाहूया:-


 1. मोजणी विषयी (Mojani) नोटीस
 2. सातबारा विषयी(7/12) नोटीस
 3. मालमत्ता पत्रक विषयी(Property Card) नोटीस

या नोटिस डिजिटल पद्धतीने आपल्या चावडीवर प्रदर्शित करण्यात येतात.

ही नोटीस प्रदर्शित झाल्याच्या 15 दिवसाच्या आत मध्ये हरकत किंवा आक्षेप असल्यास घेता येतो.

 

Aapli chawdi मोजणी विषयी (Mojani)


 • सर्वप्रथम https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi वेबसाईट पोर्टल वर जावे. 
 • आपली चावडी पोर्टलवर मोजणी विषयी (Mojani) रेडिओ बटन सेलेक्ट करा.
 • आपला जिल्हा, तालुकागाव निवडावे.
  Aapli Chawdi
  आपली चावडी पोर्टल 2023 मराठी अपडेट | Aapli Chawdi Portal 2023 marathi update

   
 • Captcha योग्य पद्धतीने लिहा व आपली चावडी पहा या हिरव्या रंगाच्या बटन वर क्लिक करा.
 • यानंतर मोजणी विषयी(Mojni) नोटीस सर्वे नंबर/ गट क्रमांक नुसार या ठिकाणी दिसेल.

 

Aapli chawdi सातबारा विषयी (7/12)


जमिनी संबंधित कोणता ही व्यवहार झाल्यानंतर सातबारा मध्ये नोंद होणे आवश्यक असते.

सातबारा मध्ये नोंद घेण्यासाठी फेरफार होणे महत्त्वाचे असते. खरेदी विक्री कोणत्या प्रकारची झाली? फेरफार कोणत्या प्रकारचा झाला? हे खालील प्रमाणे पहा-


 • सर्वप्रथम https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi वेबसाईट पोर्टल ओपन करा. 
 • Aapli Chawdi पोर्टलवर सातबारा विषयी (7/12) रेडिओ बटन सेलेक्ट करा.
 • जिल्हा, तालुका, गाव निवडा.
 • Captcha योग्य पद्धतीने लिहा व आपली चावडी पहा या हिरव्या रंगाच्या बटन वर क्लिक करा.

Aapli Chawdi
आपली चावडी पोर्टल 2023 मराठी अपडेट | Aapli Chawdi Portal 2023 marathi update

 

 • यानंतर सातबारा विषयी(7/12) सर्व माहिती याठिकाणी दिसेल जसे- 

1.  फेरफार नंबर 

2.  फेरफार चा प्रकार, (खरेदी, बोजा,हक्क सोड पत्र/ रिलीज डीड, वारस, इतर फेरफार) 

3.  फेरफार चा दिनांक

4.  हरकत नोंदविण्याची शेवटची तारीख, (फेरफार दिनांक झाल्यानंतर पंधरा दिवसा मध्ये करणे)

5.  सर्वे नंबर किवा गट क्रमांक. 

 • सातबारा विषयी झालेल्या फेरफार संबंधित अधिक माहितीसाठी सर्वात शेवटी असणाऱ्या पहा या बटन वर क्लिक करा. 
 • या ठिकाणी नोंदीचा प्रकार, लिहून देणार, लिहून घेणार, खरेदी दस्त क्रमांक, खरेदी किंमत सर्व महत्त्वपूर्ण नोंदी दिसतात.

मालमत्ता पत्रक विषयी(Property Card)


 • वरील प्रमाणेच सर्वप्रथम https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi वेबसाईट पोर्टल ओपन करा. 
 • Aapli Chawdi पोर्टलवर मालमत्ता पत्रक विषयी (Property Card) रेडिओ बटन सेलेक्ट करा.


Aapli Chawdi
आपली चावडी पोर्टल 2023 मराठी अपडेट | Aapli Chawdi Portal 2023 marathi update


 • विभाग निवडा (कोकण प्रदेश- मुंबई शहर/मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक, अमरावती, पुणे, औरंगाबाद)
 • जिल्हा, कार्यालय, गाव/पेठ निवडा.
 • Captcha योग्य पद्धतीने लिहा व आपली चावडी पहा या हिरव्या रंगाच्या बटन वर क्लिक करा.

1.  फेरफार नंबर 

2.  फेरफार चा प्रकार, (खरेदी, गहाण खत अनुसार बोजा चढविणे किंवा उतरविणे, हक्क सोड पत्र/ रिलीज डीड,बक्षीस पत्र, वारस, इतर फेरफार) 

3.  फेरफार चा दिनांक 

4.  हरकत नोंदविण्याची शेवटची तारीख, (फेरफार दिनांक झाल्यानंतर पंधरा दिवस)

5.  नगर भूमापन क्रमांक.'Aapli Chawdi'

 • मालमत्ता पत्रक विषयी(Property Card) झालेल्या फेरफार संबंधित अधिक माहितीसाठी सर्वात शेवटी असणाऱ्या पहा या बटन वर क्लिक करा. 
 • या ठिकाणी नोंदीचा प्रकार, लिहून देणार, लिहून घेणार, खरेदी दस्त क्रमांक, खरेदी किंमत सर्व महत्त्वपूर्ण नोंदी दिसतात.

वरील विषय जर काही प्रश्न असेल तर आम्हाला कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

 Aapli Chawdi

 

Post a Comment

0 Comments