उमंग ॲप बद्दल आपल्याला माहित असणे आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट | umang app

umang app
umang app

उमंग ॲप (umang app)

सर्व नागरिकांसाठी उपलब्ध असणारा डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ आता केंद्र शासनाच्या उमंग (umang) मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध झाला आहे.

महाराष्ट्र राज्यातील ३५  जिल्ह्यातील ३५८ तालुक्यातील ४४,५६० महसुली गावातील २ कोटी ५७ लक्ष सातबारा संगणकीकृत करण्यात आले असून त्यापैकी ९९% पेक्षा जास्त डिजिटल स्वाक्षरीत गाव नमुना नं. ७/१२ प्रत्येकी १५ रुपयेच्या डिजिटल पेमेंट भरून कोठूनही व केंवाही उपलब्ध होत आहे.

umang app

त्या करिता महसूल विभागाने महाभूमी हे पोर्टल विकसित केले असून या पोर्टल वरून डिजिटल ७/१२ उपलब्ध होत होते आता हीच सुविधा केंद्र शासनाच्या उमंग या मोबाईल ॲपवरून उपलब्ध होणार आहे.

हे umang app ॲप गुगल प्ले स्टोअर वरून ANDROID मोबाईल ॲप व ॲप्स स्टोअर वरून ॲपल मोबाईल साठी उपलब्ध करून दिले आहे.

आज पर्यत महाभूमी पोर्टल वरून कोटी डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख डाउनलोड करून वापरले असून त्यातून 102 कोटी रुपयांचा महसूल देखील शासनाला मिळाला आहे.

नागरिकांना व शेतकरी यांना डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ ची प्रिंट मिळविण्यासाठी महा- ई सेवा केंद्र किंवा झेरोक्स सेंटर यांचा आधार घ्यावा लागत होता परिणामी १५ रुपयांच्या ७/१२ साठी २५-३० रुपये मोजावे लागत होते. तसेच महाभूमी पोर्टल हे संकेतस्थळ लक्षात ठेवावे लागत होते.

umang app

आता मात्र उमंग मोबाईल ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून आपल्या मोबाईलवरच डिजिटल स्वरूपात ७/१२ उपलब्ध होईल व हा ७/१२ प्रिंट न काढताच अन्य व्यक्ती ला अथवा कार्यालयाना पाठविता येईल.

 'umang app'

 


Post a Comment

0 Comments