90% अनुदान ; तार कुंपण योजनेबद्दल आपल्याला आवश्यक असलेली प्रत्येक बाब | Wire Fence Scheme

Wire Fence Scheme
Wire Fence Scheme


तार कुंपण योजना(
Wire Fence Scheme)

राज्य शासन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना सतत राबवत असते. ह्या योजना सुलभ व जलद गतीने पोचहाव्या हे सरकार चे एक उदिष्ट आहे. 

शेतकऱ्यांच्या पिकाचं जंगली जनावरांपासून संरक्षण करता यावं यासाठी सुरू करण्यात आलेली अशीच एक महत्व योजना म्हणजे तार कुंपण योजना. 

तार कुंपण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेताभोवती सिमेंटचे काम व लोखंडी तार लावण्यासाठी 90% पर्यंत अनुदान दिलं जातं.'Wire Fence Scheme'

आदिवासी व दुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर जंगली जनावरांचा जास्त शिरकाव असतो; ह्या मुळे शेतकऱ्यांना शेती करत असताना या जनावरांच्या नुकसानीला सामोरे जावं लागतं, हीच बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने पिकांचे नुकसाना पासून बचाव होण्याकरिता Wire Fence Scheme ही योजना सुरू करण्यात आली.

या योजनेसाठी पात्रता, कागदपत्र, अटी व शर्ती काय असतील ? याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून या 

अटी व शर्ती : या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे अटी व शर्तीच्या आधीन राहून लाभ घ्यावा लागेल.

·         अर्जदार शेतकऱ्याचे शेत अतिक्रमित नसावे.

·         सदर जमिनीत पुढील 10 वर्षासाठी शेतीव्यतिरिक्त इतर व्यवसाय करू नये.

·         शेतजमीन वन्यप्राण्यांच्या आदिवासात नसावी.

·         शेतकऱ्यांना या तार कुंपण योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे, त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वन्य प्राण्यांपासून शेत पिकांचे नुकसान होत असल्याबाबत ग्राम परिस्थितीकीय विकास समिती / संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा ठराव व त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्ज सादर करावे लागेल.

 

आता आपण जाणून घेऊया तार कुंपण योजनेची अर्ज प्रक्रिया   

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना "Wire Fence Scheme" विहित नमुन्यातील अर्ज संबंधित कार्यालयाकडून घ्यावा लागेल, त्यानंतर अर्ज काळजीपूर्वक भरून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज हा संबंधित संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करावा

      अर्जासाठी आवश्यक कागदपत्र : खालीलप्रमाणे

  • आधारकार्ड
  • बँक पासबुक
  • जमिनीचा 7/12 8 अ उतारा
  • जात प्रमाणपत्र
  • ग्रामपंचायत दाखला
  • समितीचा ठराव व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
Wire Fence Scheme

 

Post a Comment

0 Comments