सुधारित दराने देणार पिकांची भरपाई | Pik Bharpai

Pik Bharpai
Pik Bharpai 

पिका भरपाई(Pik Bharpai)

आज आपण जाणून घेऊ राज्य सरकार कसे व कोणत्या निकषावर पिक भरपाई देईल.  

सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने राज्य सरकार ने सुधारित दरानुसार आणि निकष शिथिल करून शेतकऱ्यांना १५०० कोटी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला.

या निर्णयाचा निश्चित फायदा १५.९६ लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील २७.३६ लाख शेतकऱ्यांना होणार आहे.

याआधी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोणत्या ही निकषाशिवाय ७५० कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर मदतीसाठी राज्य सरकारने निकष ठरविले होते. परंतु , ठरवलेल्या निकषात अनेक शेतकरी बसत नसल्यामुळे सरकार ने निकष शिथिल 'Pik Bharpai' करून सुधारित दरांनुसार मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला.

याअगोदर निकषात बसलेल्या ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे त्यांना वाढीव सुधारित दरातील फरकाची भरपाई देण्यात येईल असा निर्णय मंजूर केला.Pik Bharpai

२४ तासांत ६५ मि.मी.पेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्यास अतिवृष्टी समजण्यात येते.

मात्र, अतिवृष्टी न होताही सततच्या पावसामुळे नुकसान होऊ शकते. त्यामुळे काही गावांमध्ये सतत पाऊस पडल्याने अतिवृष्टीच्या निकषात बसत नसतानाही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळले तरी देखील मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष होता.

अशी मिळणार सुधारित मदत 

  • ·        जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत ६,८०० प्रतिहेक्टरऐवजी ८ हजार ५०० रुपये.
  • ·        बागायत पिकांच्या नुकसानीसाठी १३ हजार ५०० प्रतिहेक्टर वरून १७ हजार रुपये प्रतिहेक्टर.
  • ·        बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी १८ हजार रुपये प्रतिहेक्टरऐवजी २२ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर (दोन हेक्टरच्या मर्यादेत).

नियम केले शिथिल

राजगोपाल देवरा समितीने असे सुचविले होते की सततच्या पावसासाठी तयार केलेल्या निकषात शिथिलता देऊ नये."Pik Bharpai" 

मात्र, याआधी निकषाशिवाय मदत वितरित झाल्याने यापुढील मदत निकषानुसार वितरित केल्यास रोष निर्माण होऊ शकतो असे सरकारला वाटते व यामुळे नियम शिथिल करण्यात आले.

Pik Bharpai

Post a Comment

0 Comments