पहिला हप्ता आला ,नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना | Namo Shetkari Yojana Installment

Namo Shetkari Yojana Installment
Namo Shetkari Yojana Installment

नमो शेतकरी योजना हप्ता(Namo Shetkari Yojana Installment)

2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये नमूद केल्याप्रमाणे शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी च्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने अनुदानात भर घालणारी ” नमो शेतकरी महा सन्मान निधी” ही योजना राबविण्यात आली आहे.

या योजनेतून प्रति वर्ष रक्कम सहा हजार रुपये लाभ ( दर चार महिन्याने दोन हजार रुपये अशी वार्षिक समान तीन हप्त्यात मिळेल ) पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईलNamo Shetkari Yojana Installment

आता आपण महिती करून घेऊया वर्षाच्या कोणत्या महिन्यात पैसे आपल्या खात्यात जमा होतील

'Namo Shetkari Samman Nidhi Yojanaया महिन्यात

1.  पहिला हप्ता एप्रिल ते जुलै मध्ये 2 हजार रुपये जमा होतील

2.  दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर मध्ये 2 हजार रुपये जमा होतील

3.  तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च महिन्यामध्ये 2 हजार रुपये होतील

नमो शेतकरी योजनेसाठी कुठे नोंदणी कराल?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पीएम किसान पोर्टलवर नोंदणी करणे व पात्र लाभार्थ्यांना मान्यता देण्यासंदर्भात कार्यपद्धती सुधारणा करण्यात आली आहे.
शेतकरी बांधवांनो यामध्ये वेगळी नोंदणी करण्याची गरज नाही जर तुम्ही पीएम किसान योजनेमध्ये नोंदणी केली असाल तर तुम्हाला नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे.

हप्ते कोणाला मिळणार?

मित्रांनो पी एम किसान योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्हाला तीन बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत.

1.  तुमची E-KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे.

2.  Land Seeding – YES असणे बंधनकारक आहे.

3.  महत्त्वाचे म्हणजे तुमच्या बँक पासबुक आधार लिंक असणे अनिवार्य आहे. 

जर तुम्ही हे तिन्ही बाबी पूर्ण केली नाही तर तुम्हाला इथून पुढचे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे किंवा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळणार नाही हे लक्षात ठेवा यासंदर्भात राज्य सरकार माध्यमातून वेळोवेळी अवाहान करण्यात आले आहेत.

जे लाभार्थी हे तीन बाबी पूर्ण करेल अशाच लाभार्थ्यांना इथून पुढचे हप्ते नियमित स्वरूपात त्यांच्या खात्यावरती शासनाच्या माध्यमातून जमा केली जातील याची सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी घेतली पाहिजे.

"Namo Shetkari Yojana Installment"

 

Post a Comment

0 Comments