शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जाणून घ्या काय आहे किसान क्रेडिट कार्ड व अर्ज प्रक्रिया | Kisan Credit Card

Kisan Credit Card
Kisan Credit Card

किसान क्रेडिट कार्ड(Kisan Credit Card)

शेतकरी बांधावानो ‘किसान क्रेडिट कार्ड’ म्हणजे काय? आणि ते शेतकऱ्यांना कशासाठी कामी येते बाबाची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काय आहे किसान क्रेडिट कार्ड?

‘Kisan Credit Card’ ही एक सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती संबंधित कामासाठी आर्थिक सहाय्य केली जाते.

किसान कार्ड च्या माध्यमातून शेतकऱ्यांना खते, बी बियाणे, कीटकनाशके,पशुपालन शेळीपालन, मेंढीपालन कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन यासाठी देखील कर्ज मिळते.

Kisan Credit Card योजनेचा लाभ प्रत्येक शेतकरी घेऊ शकतो. यामध्ये स्वतःच्या मालकीची जमीन असणारा जमीनधारक शेतकरी आणि भाडेतत्त्वावर शेती करणारा शेतकरी देखील समाविष्ट आहे.

किती मिळणार कर्ज?

Kisan Credit Card अंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास 3 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. या कर्जाला 7 टक्के व्याजदर लावला जातो.

परंतु शेतकऱ्यांनी जर या कर्जाची परतफेड एका वर्षात केली तर व्याजदरात 3 टक्के सवलत मिळते शेतमालाच्या विक्रीतून ही परतफेड करणे अपेक्षित असते. त्याचबरोबर शेतकऱ्यांना 1 लाखापर्यंतच कर्ज हे बिनव्याजी मिळते.  

शेतकऱ्याला अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्याला 50 हजार रुपयांचे विमा संरक्षण दिलं जाते. त्यासह इतर धोक्यांसाठी 25 हजार रुपयांचं विमा संरक्षण देण्यात येते.

कसा व कुठे कराल अर्ज?

शेतकऱ्यांना सरकारकडून पीएम-किसान योजनेच्या वेबसाईटवरच किसान क्रेडिट कार्डसाठीचा अर्ज उपलब्ध करून दिला आहे

पीएम किसान निधीच्या वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्यात Download KCC Form हा पर्याय तुम्हाला दिसेल. जेथे तुम्ही विचारलेली माहिती भरून हा फॉर्म भरू शकता.

Kisan Credit Card

 

 

Post a Comment

0 Comments