खरिप हंगामातील पीककर्जाचे दर निश्चित यंदा (Kharif Season) खरीप हंगामातील सोयाबीनसाठी हेक्टरी 53 हजार 900 तर उसासाठी 1 लाख 38 हजार रुपये कर्ज वाटप करण्याचे निर्देश राज्य सरकारने बॅंकांना दिले आहेत. शिवाय ही प्रक्रिया 30 जूनपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. या कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती खर्च भागविता येणार असून 12 महिन्यात परतफेड करणाऱ्यांसाठी सूट दिली जाणार आहे.

मुख्य पिकांना अधिकची रक्कम

सोयाबीन हे खरिपातील मुख्य पीक आहे. त्यामुळे अधिकतर शेतकऱ्यांचा भर याच पिकावर असतो त्यामुळे यंदा हेक्टरी सोयाबीनसाठी 53 हजार 900 रुपये ठरवून देण्यात आले आहेत तर उसासारख्या नगदी पिकासाठी 1 लाख 38 हजार रुपये कर्ज शेतकऱ्यांना मिळणार आहे.

पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

पीककर्जाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 7/12 उतारा, 8 अ, शेतीचा नकाशा, फेरफार, मुल्यांकन म्हणजेच व्हॅल्युनेशन, सर्व रिपोर्ट याशिवाय आवश्यक असल्यास वकिलांनी सुचवलेले इतर कागदपत्रे, आधार कार्ड झेरॉक्स आणि 3 फोटो हे आवश्यक आहे.

31 जूनपर्यंत करावी लागणार प्रक्रिया पूर्ण

खरीपातील पेरणी होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना हे कर्ज मिळाले तर त्याचा अधिकचा लाभ होणार आहे. त्यामुळे आतापासूनच ही प्रक्रिया सुरु झाली तर बॅंकांना त्यांचे उद्दीष्ट साधता येणार आहे शिवाय शेतकऱ्यांनाही त्याचा योग्य वापर होणार आहे. 

Post a Comment

0 Comments